श्री काळभैरवनाथांच्या याञेनिमित्त जंगी कुस्ती आखाडा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा ,ता.२०(प्रतिनिधी ) श्री क्षेत्र सोनारी ता.परंडा येथील, श्री काळभैरवनाथांच्या याञेनिमित्त झालेल्या कुस्ती आखाड्यात बुधवारी ता.१९ रोजी ,अंतीम एक लाख रुपये इनामाची कुस्ती महाराष्ट्र चँपीयन विजय मांडवे (सोनारी) याने नाथा पालवे (सांगली) यास घुटना डावावर चितपट करीत रोख बक्षिस पटकावले. मैदानातील अंतीम १लाख इनाम कुस्तीत विजय धुमाळ(करमाळा) व राजेंद्र सुळ (सातारा) यांच्यात होवुन अटीतटीच्या,तुल्यबळ लढतीनंतर बरोबरीत सोडविण्यात आली. या कुस्ती मैदानात रोख इनामाच्या लहान मोठ्या २०० कुस्त्या घेण्यात आल्या.
.या कुस्ती आखाड्यासाठी राज्यातील नामांकीत मल्लानी हजेरी लावली होती.
सोनारी येथील श्री काळभैरवनाथांचा याञाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.”लाल मातीवरच्या कुस्तीत आहे खरी मस्ती” याचा प्रत्यय आखाड्यात आला. याञेनिमित्त बुधवारी ता.१९रोजी दुपारी ४ ते राञी ९.०० वाजेपर्यंत भव्य कुस्ती आखाडा घेण्यात आला.नवीन बांधलेल्या भक्तनिवासासमोर भव्य कुस्ती आखाड्याचे पुजन जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व मान्यवरांनी केले. दुपारी चार वाजता कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली.यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,शिवछञपती पुरस्कार विजेते बाळासाहेब आवारे,उपमहाराष्ट्र केसरी आबा सुळ (सातारा),भैरवनाथ तालमीचे संस्थापक नवनाथ जगताप, जेष्ठ वस्ताद विश्वनाथ काशीद, जेष्ठ निवृत्त क्रिडाशिक्षक शिवाजी कदम, महाराष्ट्र चँपीयन आप्पा काशीद,बापु मांडवे,आण्णा महाराज (नगर),महाराष्ट्र चँपीयन राम काशीद, भैरवनाथ मंदीराचे मुख्य समीर पुजारी, अंबीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत हिंगे,विक्रांत वाघमारे आदिंची उपस्थिती होती. सोनारी हे गाव कुस्ती खेळासाठी राज्यात सर्वपरिचित आहे.या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी महाराष्ट्रातुन अनेक नामांकित मल्ल हजेरी लावतात. राज्यातील विविध भागामधुन नामांकित मल्ल ,आजी-माजी वस्तादमंडळी आवर्जुन कुस्तीआखाड्यासाठी हजेरी लावतात.स्पर्धेसाठी सुसज्ज लाल मातीचा आखाडा तयार केला होता.या कुस्ती मैदानात २०० रुपयापासुन एक लाखा पर्यंत इनाम बक्षिसे देण्यात आली.२०० लहान-मोठ्या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.दुरगावाहुन आलेल्या मल्लांनी कुस्ती खेळातील डाव-प्रतिडावांचे मल्लयुध्द खेळुन मैदानात मोठी रंगत आणली.हलगीच्या कडकडाटात मल्लांनी चटकदार व चितपटीने केलेल्या कुस्त्यांमुळे आखाड्यात पैलवानांच्या खडाखडीने स्पर्धा रंगतदार झाल्या.या मैदानात कुस्तीचे डावपेच ढाक मारणे,एकेरी पट काढणे,साल्तु(बॕक थ्रो)झोळी बांधणे,भारंदाज,कलाजांग,एकलांगी,घुटना,घिस्सा,छडी टांग,दसरंग फिरणे,कुंदा करणे, मोळी बांधणे आदि डावांनी मैदानात मोठा रंग भरला होता.विजयी मल्लांना प्रेक्षकांनी रोख बक्षिसे दिली. मैदानात मल्ल हणमंत पुरी, दिपक पाटील,विरेंद्र काशीद, विकास गटकळ, सागर मोरे, मेघराज जगताप, धीरज बारसकर, सुमीत काळे,बबलु मदने, कृष्णा पवार, केतन साळुंखे, सागर ठवरे, तुकाराम मांडवे,शहाजी फले, विजय चोरगे,दगडु फरतडे, शिवयोग पडघण, किरण पाडुळे, सुनिल नवले, सतपाल सोनटक्के, किशोर घोगरे, करण फले यांनी प्रतिस्पर्ध्यास चितपट करुन प्रेक्षणीय विजय मिळविले ,या आखाड्यात महिला कुस्तीगीर अहिल्या लवटे, सोनाली हाडसे, प्रतिक्षा कोळी, तेजस्वीनी शिंदे आदिंनी प्रेक्षणीय विजय मिळविले. जेष्ठ वस्तादमंडळीचा गौरव सत्कार करण्यात आला.पंच म्हणुन धनंजय सावंत, आप्पा काशीद, जयराम नलवडे, शिवाजी घाडगे,राम पाटील संजय साळुंखे, बालाजी मिस्कीन, दिलीप मोरजकर, राहुल भांडवलकर, यांनी काम पाहिले.प्रसिद्ध कुस्ती निवेदक राजाभाऊ देवकते (वाकडी) दिनेश गवळी (बार्शी) यांनी उत्कृष्ट खुमासदार समालोचन केले.कुस्ती आखाड्यासाठी, याञाकमिटीचे संभाजी सुरवसे,नवनाथ जगताप,शांतीलींग गाढवे,भाऊसाहेब मांडवे,राम पाटील,आगंद फरताडे,सरपंच दिपक दुबळे,रवी मांडवे, आदिसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.या कुस्ती आखाड्यासाठी ,कोल्हापूर ,सांगली,सातारा,सोलापूर ,पुणे,नगर,बीड,उस्मानाबाद,आदि भागातुन मल्ल आले होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!