श्री क्षेत्र सोनारी येथे भक्तिमय व जल्लोशपुर्ण वातावरणात यात्रा संपन्न.

starmazanews

starmazanews

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने महाराष्ट्राच्या पावन भूमीत धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची जी पुरातन श्रद्धास्थाने आहेत त्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे सोनारी येथील सिद्धनाथ म्हणजेच श्री काळभैरवनाथ होय. श्री भैरवनाथांनी राक्षसांचा नाश केला याचाच आनंदोत्सव म्हणून दरवर्षी श्रीक्षेत्र सोनोरी येथे चैत्र वैद्य अष्टमी पासून ते त्रयोदशीपर्यंत मोठी यात्रा भरते. सोनारी येथील श्री काळभैरवनाथांचे हे महाराष्ट्रातील मूळ स्थान असून अनेक उपठिकाणे आहेत.

आज श्री क्षेत्र सोनारी येथे भक्तिमय व जल्लोशपुर्ण वातावरणात ही यात्रा संपन्न होत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात व प्रसन्न वातावरणात साजरा होणाऱ्या श्री काळभैरवनाथ यात्रेत सहभागी होत दर्शन घेतले व माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्याची श्री काळभैरवनाथ चरणी प्रार्थना केली.

श्री काळभैरवनाथांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना, दररोजच्या व्यस्त कामातून अखंड आणि अविरत जनसेवा करण्याची ऊर्जा मला अशा सांप्रदायिक कार्यक्रमातून मिळते.

याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, भक्तगन, नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!