परांडा येथे दिव्यांग कृती साहित्य मोजमाप शिबिराचे आयोजन.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा येथे दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार मा श्री ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी दिव्यांग सशक्तिकरण विभाग सामाजिक न्याय अधिकारीता मंत्रालय भारत सरकार यांच्या ADIP एडीआयपी योजनेअंतर्गत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी एल्मिको कार्यालय मुंबई जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने परांडा येथे पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी मोजमाप शिबिराचे आयोजन केले आहे या मोजमाप शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

*अत्यंत महत्त्वाचे ♿*
परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना कळविण्यात येते की दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी दिव्यांग कृत्रिम साहित्य मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे मोजमाप शिबिर समाज कल्याण विभाग व एल्मीको मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. तरी आपण मोजमाप शिबिर देण्यासाठी उपस्थित राहावे असे आव्हान आपणास दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे
*सोबत आवश्यक कागदपत्रे*
????आधार कार्ड
????रेशन कार्ड
????उत्पन्न दाखला
????रंगीत फोटो इत्यादी
*शिबिराचे ठिकाण*
पंचायत समिती सभागृह परांडा
वेळ सकाळी: १०:०० ते ३:००

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!