जि.प.प्रा.शाळा कात्राबाद येथे इयत्ता 4थी च्या विद्यार्थ्यांना निरोप व 1 ली च्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ संपन्न.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
दि. 15 एप्रिल २०२३ रोजी प्रा.शा .कात्राबाद शाळेत इयत्ता 4थी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल गरड व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच लक्ष्मीताई कोळी उपस्थित होत्या. यावेळी इयत्ता 4 थी ची विद्यार्थ्यांनी शुभ्रा विलास गरड हिने आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला तसेच सर्व गुरुजनांचे आपल्या आयुष्यातील ज्ञानरूपी योगदान नमूद केले. विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.तसेच शाळेच्या वतीने 4थी च्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी शैक्षणिक वर्ष 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली च्या दाखलपात्र विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. आलबते सर यानी शाळेतील विध्यर्थी यांचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वतीने सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री अलबत्ते सर, श्री. कापसे सर, गोपीनाथ बोराडे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी सरपंच लक्ष्मीताई कोळी, अध्यक्ष अमोल गरड,उपाध्यक्ष मीनाताई शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विलास गरड,परमेश्वर बोराडे, लक्ष्मण गरड, राजेंद्र गरड,दिलीप शिंदे,गोपीनाथ बोराडे, सारिका बोराडे,सुलभा गरड,सुकन्या नलवडे तसेच विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रविंद्र कापसे सर तर आभार मुख्याध्यापक श्री. गोवर्धन अलबते सर यांनी केले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!