नाॅट रिचेबल झालेले विरोधी पक्षनेते थेट पुण्यात कार्यक्रमात….

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत.अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.त्यातच सामाजिक कार्यकर्ते आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी ट्वीट केलं आहे.त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं होतं दरम्यान नॉट रिचेबल असलेले अजित पवार आज पुण्यात एका कार्यक्रमात दिसले आहेत.

काल अजित पवार सकाळी पुण्यात होते.पवारांनी पुण्यातील कार्यक्रम रद्द करत ते नाॅट रिचेबल झाले आहेत.अशा सर्वत्र चर्चा सुरू झाल्या होत्या.यावरुन अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, प्रकृती अस्वस्थ झाल्यानं कालचे दौरे रद्द केले आहेत.कारण नसताना बदनामी नको असं अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.पुणे येथील खराडी येथे एका ज्वेलरीच्या उद्घाटनासाठी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दाखल झाले होते.यावेळी दोघांनी मिळून दागिन्यांची पाहणी देखील केली.राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाॅट रिचेबल होते.मात्र,ते पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या संपर्कात होते.त्यामुळे अजित पवार पुण्यात दाखल झाल्यानंतर जे मोजके सहकारी त्यांच्या सोबत होते.त्यामध्ये नाना काटे, आमदार सुनील टिंगरे सोबत होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!