स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:-चिखली येथे 17वर्षीय मुलीचा दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला.प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.खून करणार्या दोघांपैकी एकजण 17तर एकजण 14वर्षांचा आहे.चिखलीतील घरकुल येथे 17 वर्षे मुलीच्या खून प्रकरणी दोन अल्पवयीन संशयित आरोपींना चिखली पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले.त्याना बुधवारी ता.5 न्यायालयात हजर केले असता,त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.दरम्यान, खून झालेल्या मुलीवर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी घरकुल परिसरातील महिला व नागरिकांनी संताप व्यक्त करत , आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.या घटनेमुळे अनेक महिलांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे.पाच टक्के गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे परिसरात गुंडागर्दी निर्माण होते आणि सर्व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.अशी भावना येथील महिलांनी व्यक्त केला आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.