स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
६८३ हेक्टरवरील क्षेत्राला मिळणार लाभ.
परंडा : पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या आदेशावरून उन्हाळी पिकांसाठी सीना-कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यात दि. ४ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिसरातील ६८३ हेक्टवरील उन्हाळी पिकांना याचा लाभ होणार असून परंडा, भोत्रा, रोसा, नेरला शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांना फायदा होणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तन पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे केली होती. याची दखल घेत डॉ सावंत यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सलीम आवटे यांना पाणी सोडण्याबाबत सुचना केल्यावरून पाटबंधारे विभागाने सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या दोन दरवाजातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते पूजन करून पाणी सोडले. यावेळी शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, औदुंबर गाडे, डॉ अमोल गोफणे, अमोल गोडगे, राजकुमार देशमुख, अरविंद गोडगे, अरविंद गोफणे, राम लोंढे, आबा गोफणे, अंगत शिंदे, कुलदीप देशमुख, बालाजी शेळके, दत्तात्रय चौधरी, कृष्णा शेंडगे, अजिनाथ गोफणे, अश्रू नलवडे, अमोल नलवडे, आप्पा कारंडे, विभागीय अभियंता संजय कागरे, उपविभागीय अभियंता अमित शिंदे, सहाय्यक अभियंता अभय पाटील, कालवा निरीक्षक सचिन होरे, कालवा निरिक्षक सुनिल सोनवणे आदी उपस्थित होते. तालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. मागील वर्षी तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. जिल्ह्यासह तालुक्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाल्याने सीना-कोळेगाव प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पिके जोमात असून त्यांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे भोत्रा कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.