स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- सातारा जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजयकुमार बन्सल यांचे नाव वापरून एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रावेत येथे घडला रम विजय खंडकर वय 31 रा.रावेत यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9368317294 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यक्तीने फिर्यादी यांना फोन करून तो आयपीएस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलत असल्याने सांगितले .फिर्यादी यांच्या आधार कार्डचा वापर आंतरराष्ट्रीय दहशतवादासा होऊ शकतो .तुमच्या बॅंक खात्यावरुन सहा व्यवहार झाले. असुन त्याचा गैरवापर झाला आहे. असेही फोनवरील ठगाने महिलेला सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करून संशयित सहा व्यवहारांची तपासणी करण्यासाठी प्रत्येकी 98 हजार 326 रपये सुरक्षा ठेव म्हणून मागितले .महिलेने देखील सहा व्यवहारांची चौकशी करण्यासाठी पाच लाख 89 हजार 956 रुपये दोन बॅंक खात्यांवर पाठवले .त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. महिलेने पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.