इंद्रायणी नदी शेजारी दुर्गंधी आणि कचर्याचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष.

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.


देहू:- देहुगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. दररोज वारकरी, भाविक दर्शन घेण्यासाठी येतात मात्र देहू परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी देतील इंद्रायणी नदी शेजारी कचरा टाकल्यामुळे परिसर स्वच्छ झाल्याचे आढळून आले आहे. या परिसरात स्थानिक मंदिरासमोर इंद्रायणी नदीच्या कडेला व मागच्या बाजूला कचरा टाकत आहेत. तसेच इंद्रायणी नदीच्या कडेला असणाऱ्या सुरक्षा फलकाची दूर व्यवस्था झाली आहे. ते फलक तुटून पडलेले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. पुलाच्या बाजूला कचरा साचलेला असल्यामुळे तो कचरा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे सर्व परिसरात पसरत आहे. या पुलावरून चार चाकी, दोन चाकी, टेलर आधी वाहनांची वर्दळ असते. त्यामध्ये या परिसरात राज्यभरातून जिल्ह्यातून भाविक व वारकरी वर्ग मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र स्थानिक असणाऱ्या नागरिक इंद्रायणी नदीमध्ये कपडे धुतात तर काही कचरा टाकत असल्यामुळे परिसर अस्वच्छ दिसत आहे. तसेच कचरा टाकत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे. देहुतील पुलाचे संरक्षण तुटल्यामुळे रात्रीच्या वेळेत वेगाने वाहने येतात. त्यामुळे अपघाती होऊ शकतो किंवा कोणीही व्यक्ती किरकोळ जखमी देखील होऊ शकते. या पुलावरून शाळेतील विद्यार्थी ये जा करतात. त्यांचा देखील तोल जाऊन अपघात होऊ शकतो. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असून झालेल्या दुरावस्तेकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!