महानगरपालिकेची स्वच्छतेसाठी मशाल यात्रा काढून जनजागृती.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.

पिंपरी चिंचवड:- शहरांमध्ये सर्वेक्षण २०२३ ची अंमलबजावणी सुरू आहे.त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत स्वच्छोत्सव मशाल यात्रा काढून जनजागृती करण्यात आली.यानुसार ड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव येथील स्वच्छोत्सव मशाल यात्रा कार्यक्रम आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.तसेच अ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खंडोबा मंदिर आकुर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छोत्सव मशाल यात्रा कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत विविध ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपायुक्त अजय चारठाणकर, स्वच्छ समन्वय कक्ष प्रमुख सोनम देशमुख, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, उमाकांत गायकवाड, सिताराम बहूरे, शीतल वाकडे , राजेश आगळे,सुचेता पानसरे, अमित पंडित, सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते,राजू साबळे, महादेव शिंदे, महेश आढाव, राजेश भाट, आणि माजी पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक संस्था आयसी टीम, बेसिक टीम, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!