महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री काॅंग्रेसच देईल – प्रणिती शिंदे

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.


पिंपरी चिंचवड:- शिंदे फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही.महिला व बालकल्याण खातेही महिलेकडे नाही.ही मोठी शोकांतिका असल्याची टीका करत राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री काॅंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.पिंपरित पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, महिला मंत्र्यांकडे नगरविकास, महसूल, उत्पादन शुल्क अशी खाती मिळाली पाहिजेत .या सरकारमध्ये तर एकही महिला मंत्री नाही.महिलेकडे महिला व बालकल्याण खातेही नाही.या देशाला पहिल्या महिला पंतप्रधान महिला राष्ट्रपती, महिला लोकसभा अध्यक्षा काॅंग्रेसने दिल्या.त्याप्रमाणे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री काॅंग्रेस देईल.काॅंग्रेसने दलितांवर कधीच अन्याय केला नाही.सुशीलकुमार शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले .देशाचे गृहमंत्री, ऊर्जामंत्री केले.लोकसभेचा नेता केले.काॅंग्रेसने कधीही दलितांवर अन्याय केला नाही, असेही त्या म्हणाल्या.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!