आपची शहरात फलकबाजी ,देश बचाव मोदी हटाव

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.

पिंपरी चिंचवड:- आम आदमी पार्टीने ‘ मोदी हटाव देश बचाव’ ही मोहीम हाती घेतली आहे.त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात फलकबाजी केली आहे.मोदी सरकार दडपशाही करत आहे.हिंडनबर्ग रिपोर्टर अदानी समुहाचा घोटाळा उघडकीस आणला.एल आय सी एस बी आय या सरकारी संस्थांची ,तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याचे त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली.परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केल्याचा आरोप आपचा आहे.
ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यांसारख्या कायद्याचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे.महागाई बेरोजगारी सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.या सर्व पाश्र्वभूमीवर मोदी सरकारला केंद्राच्या सत्तेतून पायउतार केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही.त्यामूळे आम आदमी पार्टीने देशभरात “मोदी हटाव देश बचाव” ही मोहीम देशभर सुरू केल्याचे आपकडुन सांगण्यात आले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!