स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
मोशी:- मोशी प्राधिकरणातील पेठ क्र४ मधील लोंढे उद्यानाशेजारिल प्राधिकरणाच्या आरक्षित रिकाम्या भुखंडामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणगवत , झाडेझुडपे वाढली आहेत.तर काही नागरिकांनी राडारोडा व कचरा मोठ्या प्रमाणात टाकला आहे.परिणामी दुर्गंधी व डासांचाही प्रादुर्भाव वाढल्याने स्थानिक नागरिकांना विविध समस्यांवर सामोरे जावे लागत आहे.या भुखंडांची स्वच्छता करण्याची मागणी स्थानिक नी केली आहे.पिपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने मोशी प्राधिकरणाचा नियोजनबद्ध असा विकास केला आहे.नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी प्राधिकरणाने आरक्षण टाकून भुखंड आरक्षित केले आहेत.त्यावर कोणी अतिक्रमण करु नये म्हणून त्याभोवती सीमा भिंती उभारल्या आहेत.तर काही भुखंड सध्या पाणगवत, झाडेझुडपे वाढली आहेत.तसेच काही नागरिकांनी राडारोडा व कचरा टाकला आहे.त्यामुळे प्राधिकरणातील भुखंडाची स्वच्छता करण्याची मागणी होऊ लागली आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.