परांडा नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग 5% टक्के निधीचे वितरण..

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने


परांडा प्रतिनिधी
परंडा येथे आज 28 मार्च 2023 रोजी शासन निर्णय 2015 नुसार दिव्यांग पाच टक्के निधीचे वितरण दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या निवेदनानुसार मार्च अखेर परांडा नगरपालिकेने दिव्यांग निधीचे वितरण केले हा वितरण सोहळा आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे सभागृह परांडा येथे पार पडला यामध्ये परांडा नगरपालिकेने 146 दिव्यांग बांधवांना 5% निधीचे ई प्रणाली द्वारे वाटप केले एकूण रक्कम 9 लाख रुपये आरटीजीएस द्वारे दिव्यांगाच्या खात्यात वर्ग करण्यात आली अशी माहिती परांडा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी सौ मनीषा वडीपल्ली मॅडम यांनी दिली यावेळी वडेपल्ली मॅडम यांनी दिव्यांग बचत गट स्थापन करावा अशी माहिती दिली व दिव्यांगांनी बचत गट स्थापन करून स्वावलंबी बनावे दिव्यांगाने दिव्यांगांचा उद्धार करावा व वेळोवेळी लागणाऱ्या मदतीची गरज करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहो व स्वच्छताचे महत्त्व देखील यावेळी मॅडमने कार्यक्रमांमध्ये माहिती दिली विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये परंडा नगर परिषदेचे कर्मचारी महेश एकशिंगे किरण शिंदे अमोल अंगरके रंजीत काशीद जलाल मुजावर कसबे सोमनाथ आधी अधिकारी वर्ग उपस्थित होते तसेच यावेळी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने महिला अध्यक्ष शैला पोद्दार, भारत झोंबाडे आधी दिव्यांग खूप मोठ्या संख्येने असे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या निधीमुळे दिव्यांगाच्या मनामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!