परंडा काँग्रेसच्या वतीने २७ मार्च रोजी
भाजप सरकारच्या हिटलरशाहीचा जाहीर निषेध करण्यात आला.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा.भाजप सरकारच्या हिटलरशाही प्रवृत्तीचा निषेधार्थ रास्ता रोको,
सोमवार, दि.27 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस नेते राहुल गांधींजी यांची खासदारकी रद्द करणे अत्यंत दुर्दैवी व लोकशाही विरोधी घटना आहे. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. हे संविधान आणि लोकशाहीत बसत नाही. हा जो निर्णय लोकसभेने घेतला आहे तो निर्णय लोकशाहीला धक्का देणार आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी दिनांक 27 मार्च 2023 रोजी परांडा शहर येथे परंडा शहर व जिल्हा काँग्रेस च्या वतीने ता.अध्यक्ष अॅडवोकेट हनुमंत वाघमोडे व अॅडवोकेट नुरोद्धीन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) ता.अध्यक्ष मेघराज पाटील उपस्थित होते.मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी कालीदास खैरे, जिल्हा काँग्रेस सदस, अॅडवोकेट श्रीकांत भालेराव, जिल्हा सचिव, नितीन गाढवे, अ.जा.प्रदेश सचिव अॅडवोकेट रविंद्र सोणवने,ता.कार्यअध्यक्ष अजय खरसडे,शहर अध्यक्ष रमेश परदेशी,ता उपाध्यक्ष, जयसिंग बिडवे, ओबीसी अध्यक्ष महावीर ईतापे, सदानंद बोंबलट.तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!