पीसीएमसी कडुन ओला व सुका कचरा एकत्र उचलणे बंद.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक एप्रिलपासून ओला व सुका मिश्रित कचरा उचलायचे बंद करणार आहे.पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह यांच्यानुसार हा निर्णय जास्त मनुष्यबळ लागू नये म्हणून घेतला आहे. कचरा व्यवस्थापन नियम २०१६ प्रमाणे कचर्याचे वेगळीकरण हे कचरा गोळा करायच्या आधीच व्हावं असे म्हणणे आहे.आयुक्त शेखर सिंह यांचे म्हणणे आहे जे व्यावसायिक कारखाने कचर्याचा नियम पाळत नाहीत त्यांना दंड भरावे लागतील.शेखर सिंह म्हणाले की औद्योगिक कचरा घातक आणि घातक नसलेले असे दोन प्रकार आहेत.आम्ही घातक कचर्यावर प्रक्रिया करत नाही.ते रांजणगाव येथील एका प्लांट मध्ये एका खासगी विक्रेत्याने उचलले जाते आणि तेच पुढे प्रक्रिया करता . औद्योगिक भागातील ओपन वेस्टमध्ये घरगुती कचरा प्रक्रिया युनिट मध्ये आगीचे अनेक अपघात होतात.त्यामुळे औद्योगिक घटकांना उगमस्थानी कचरा वेगळे करण्यास सांगितले आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०२३चा एक भाग म्हणून नागरिकांना कचर्याचे वेगळीकरण करण्याबाबत शिक्षित करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविले असल्याचे पीसीएमसी अधिकार्यांचे म्हणने आहे.काही निवासी आणि औद्योगिक भागात कचर्याचे योग्य प्रकारे विलगीकरण नाही.काही व्यक्ति आणि कंपन्या कचरा रस्त्यावर टाकतात.असे होऊ नये यासाठी कठोर कारवाई केली जाईल. विलिनीकरण न केलेला कचरा उचलणे हा रहिवाशांना शिस्त लावण्याचा एक मार्ग आहे.असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!