महापालिकेचे कामकाज पुर्वपदावर,संप मागे.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.काळ्या फिती लावून आज गुरुवारी सकाळपासून कामकाज सुरू केले आहे.त्यामुळे दोन दिवसानंतर महापालिकेचे कामकाज पुर्वपदावर आले आहे.जुनी पेन्शन योजनसह विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस संप केला.मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने बुधवारीही बेमुदत संप सुरू होता.दोन दिवस संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महापालिकेचे सर्व कामकाज बंद झाले होते.१ नोव्हेंबर २००५ पुर्वी महापालिका सेवेत रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू आहे.अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता.त्यानुसार पेन्शन लागू असलेले कर्मचारी आज सकाळी कामावर रुजू झाले.त्यानंतर २००५ नंतरचे कर्मचारीही कामावर हजर झाले.त्यामुळे संप संपला असून कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!