www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन 2023 हे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सिरसाव गावामध्ये साजरे करण्यात आले मकर संक्रांति भोगी सण हा पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून परंडा तालुक्यातील शिरसाव गावामध्ये अतिशय आनंदाने साजरा करण्यात आले पौष्टिक तृणधान्य बद्दल माहिती देण्यात आली तृण धान्यापासून विविध पदार्थ बनवणे छोटेखानी घरगुती उपक्रम राबवणे भगरीचा शिरा नाचणी बाजरी बिस्किट बाजरी भाकरी ज्वारीच्या लाह्या नाचणीचे सुप राजगिरा लाडू ज्वारीच्या पापड्या बाजरीच्या खारवड्या अशा प्रकारचे पौष्टिक तृणधान्य व त्याचे महत्त्व मकर संक्रांति भोगी या सणाचे औचित्य साधून पौष्टिकरणधान्य दिन सिरसाव मध्ये महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून साजरा केला या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी माननीय श्री शुक्राचार्य भोसले साहेब तसेच मंडळ कृषी अधिकारी जवळा कैलास देवकर साहेब तसेच शिरसाव गावचेकृषी सहाय्यक राहुल जाधव गावातील सरपंच कुमार वायकुळे माजी सरपंच संजय पवार ग्रामपंचायत सदस्य मुकुंद चोबे यशवंत देवराम मंगेश जाधव समाधान चोबे दादा लटके तसेच महिला बचत गटाचे सीमा नवले जयश्री चौबे जया उमाप व बचत गटाच्या सर्व महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच आरोग्य खात्याचे हंडेबाग मॅडम यांनी तृणधान्याचे आरोग्य विषयी महत्व पटवून दिले तसेच गावातील काटकर कुटुंबीयांनी तृणधान्यापासून बनवलेल्या ज्वारी बाजरीच्या पदार्थ पासून बनवलेले कुरवड्या खरवड्या पापड्या भाकरी असे विविध पदार्थ दाखवण्यात आले छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी मार्गदर्शन देण्यात आले. ।। तृणधान्ये आहे सर्वात भारी नाही जावे लागणार दवाखान्याच्या दारी।।
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.