शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

starmazanews

starmazanewswww.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

शिक्षकाचे लज्जास्पद वर्तन, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.
बार्शी – शहरातील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुलमधील एका विद्यार्थीनीसोबत शाळेतील शिक्षकाच्या अश्लील वर्तना प्रकरणी, मुलीच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपाला ४ चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बार्शी येथील गाताची वाडी परिसरातील इंग्लिश मिडीयम स्कुलमधील इंग्रजी विषयाचा शिक्षक राजेश सर याने इयत्ता ८ वी च्या वर्गात शिकणाऱ्या मुलीशी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या ॲप वरून चॅटिंग करून. त्या शिक्षकाने, अल्पवयीन मुलीस लज्जास्पद मेसेज केले . याबाबत मुलीने ती माहिती पालकांना दिल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात आली. आरोपी शिक्षक राजेश सर याच्याविरुद्ध पोक्सो कलम ३५४ D, ५०६, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यापूर्वी ही या शाळेबाबत विद्यार्थ्याच्या अनेक तक्रारी असताना देखील शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते त्यामुळेच या शाळेतील शिक्षकांचे धाडस वाढले असल्याचे दिसून येत आहे, या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्या मार्फत चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे या सर्व प्रकरणातुन सत्य बाहेर येईल अशी मागणी पालक वर्गातून होत आहे या सर्व गैरप्रकारची सखोल चौकशी व्हावी तरच या शाळेमधील विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास आणि गैरप्रकार समोर आल्याशिवाय राहणार नाही.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!