स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- स्वयंशिस्त ,बलिदान ,मानवता, कष्ट करण्याची तयारी, जिद्द ,व्यक्तिमत्व विकास आधी गुणांचा समग्र विकास राष्ट्रीय सेवा योजना सारख्या शिबिरामधून होतो. शिबिरामधून स्वयंसेवक घडतो परिपक्व झालेला स्वयंसेवक दिवसाच्या हातभार लावतो. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिबिरांची भूमिका महत्त्वाची ठरते असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मावळ तालुक्यातील तलाठ येथे पार पडले. शिबिराच्या समारोपप्रसंगी चंद्रकांत शेटे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दीप्ती पेठे. डी.पी. काकडे प्राध्यापक रोहित नागलगाव, शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे 100 स्वयंसेवक गावातील ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संस्थेचे कार्य व चंद्रकांत शेटे पुढे म्हणाले की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. स्वयंसेवक संघाची अनेक शिबिरंगी तुमच्यासारख्या विद्यार्थी तसेच नंतरच्या काळात सुद्धा शिबिरामध्ये सहभागी झाला आहे. या शिबिरामधून मी देखील घडलो आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये पाहताना मला माझा समग्र जीवनाची आठवण होते आहे विद्यार्थ्यांनी अशा शिबिरांमध्ये सहभागी झाले तर निश्चितपणे त्यांच्या सर्वांगीण विकास होणार आहे. याप्रसंगी सात दिवशीय शिबिराचा आढावा कार्यक्रम मधी अधिकारी प्राध्यापक दीप्ती पेठे यांनी घेतला. तसेच शिबिरामध्ये उज्वल कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला शिबीर भारती विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. गावचे सरपंच बिजाताई संतोष जाचक उपसरपंच कविता पप्पू पवार जावेद मुलांनी गावातील ग्रामस्थ आती मान्यवर शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.