www.starmazanews.com परंडा प्रतिनीधी:-डॉ शहाजी चंदनशिवे
प्रतिनिधी
परांडा दि. 20 डिसेंबर 2022 अल्पसंख्यांकाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती करावी असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक हक्क दिवस कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. सहसंचालक उच्च शिक्षण विभाग औरंगाबाद यांच्या परिपत्रकानुसार प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ हरिश्चंद्र गायकवाड सर उपस्थित होते.
व्यासपीठावर आई क्यू ए सी चेअरमन डॉ महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले की अल्पसंख्यांक वर्गातील लोकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचे प्रतिनिधित्व करावे व मागे राहिलेल्या आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांच्याही प्रगतीमध्ये अनमोल योगदान द्यावे तरच अल्पसंख्यांकांची प्रगती होऊ शकते .या कार्यक्रमासाठी कनिष्ठ वरीष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा डॉ विद्याधर नलवडे यांनी मानले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.