पुणे बंद…. शहरात शुकशुकाट.

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.comपुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पुणे:-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आज दि१३ बंद पुकारला आहे. बंदमुळे शहरातील दुकाने , हाँटेल सकाळपासून बंद होती . बंदमुळे शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.बंदमुळे शहरातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे.पीएमपी बस सेवा तसेच रिक्षाही बंद आहेत. शहरितील हाँटेल , दुकाने बंद आहेत.सकाळपासुन शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला . डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला.लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा शिवाजी रस्त्यावरुन लाल महाल चौकात जाणार आहे. मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.मोर्चाच्या मार्गावर लक्ष्मी रस्ता परिसरात दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.हडपसर,कात्रज,नगर रस्ता, कोथरूड,वारजे, येरवडा, परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!