स्टार माझा न्यूज:– पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
चिखली: -रोहण चव्हाण सोशल फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महाआरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. १हजार९२नागरिकांची नेत्र तपासणी केली. त्यातील६१२ जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबीरात१९७६ जणांनी तपासणी करून घेतली. चिखली, जाधववाडी ,वडाचामळा येथे हे शिबीर पार पडले. स्थलांतरीत अंगमहनती,रोजंदारी श्रमिक नागरिकांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी मि विशेष प्रयत्न करणार आहे. कोरोना काळाने आरोग्यचे महत्व आणि त्याचे मोल कळले आहे. आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा आहे. वृध्द महीला व गरजू नागरिकांसाठी सोशल फाऊंडेशन काम करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन दर्शन इधाटे,सुरज राउत,उमेश आवटे,राहुल बोर्हाडे,श्रेयश जाधव ,कुणाल ताजणे,स्वराज बोराडे ,तेजस आल्हाट,अभिसेख नेवाळे प्रवीन पवार,संदेश काळभोर, नकुल बोत्रे व समस्त रोहन दादा चव्हाण सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









