www.starmazanews.comपुणे विभाग प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-शिरुर लोकसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीत विजयीश्री खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ति राज्य मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी मतदार संघाचा दौरा केला.
पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने लोकसभा कोअर कमिटी आणि प्रमुख पदाधिकार्यांची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी शीरुर लोकसभा निवडणुक प्रभारी तथा आमदार माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष तथा आमदार महेश दादा लांडगे, माजी मंत्री बाळा भेगडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, समन्वयक धर्मेंद्र खांडरे , जिल्हा परिषद गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार,संघटन सरचिटणीस अमोल थोरात , सरचिटणीस विजय फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.