www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने / डॉ शहाजी चंदनशिवे
शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा 2022 चे प्र कुलगुरू डॉ श्याम शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन.
औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद जिल्ह्याचे स्पर्धक सहभागी
परांडा .(उस्मानाबाद )दि. 20 नोव्हेंबर 2022. कुस्ती हा भारतातल्या मातीतला खेळ आहे आणि या खेळासाठी प्रचंड मेहनत घ्यावे लागते सध्या कुस्तीवर संशोधन सुरू आहे. कुस्तीमुळे निर्णय क्षमता आणि हिम्मत खेळणाऱ्या पैलवानामध्ये येते .यश अपयश पचवण्याची ताकद कुस्तीमध्ये आहे असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ श्याम शिरसाठ यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये उद्घाटन प्रसंगी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजी अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयांमध्ये केले होते त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते .

यावेळी उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ श्याम शिरसाठ, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेची खजिनदार जयकुमार शितोळे, ओम साई शिक्षण प्रसारक मंडळ परांडा या संस्थेचे अध्यक्ष गोरख मोरजकर, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे , प्राचार्य डॉ सुनील जाधव, डॉ बप्पासाहेब मस्के, डॉ भागचंद सानप, डॉ संदीप जगताप, डॉ भुजंग डावकर ,डॉ उमेश सलगर, डॉ शेखर शिरसाट, डॉ शरद कचरे, आणि भाऊसाहेब खरसाडे आदी उपस्थित होते . डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. रा गे शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील स्पर्धक यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी गोरख मोरस्कर, जयकुमार शितोळे, संजय निंबाळकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी औरंगाबाद येथील नितेश काबलिया या स्पर्धकाने आंतरराष्ट्रीय पंच परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेशकुमार माने यांनी केले सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ कृष्णा परभने यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.