स्टार माझा न्यूज:- पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड,६ नोव्हेंबर
निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि त्यावर पडलेले शेकडो खड्डे अद्यापही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बुजवलेले नाहीत ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट युतिमुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना धोकादायक चूकवत जगावे लागत आहे.आम आदमी पार्टीच्या पिंपरी विधानसभा कार्यकारी अध्यक्ष ब्रम्हानंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथे खड्याभवति मातीच्या पणत्या लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले
“अवेळी खालील मागण्या केल्या”
१ मनपा आयुक्तांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात खड्डे सर्वेक्षण योजना राबवून खड्डे मोजावे आणि संबंधित ठेकेदार, अधिकारी यांना रिजेक्शन चार्जेस लावून मोफत दुरुस्ती करून घ्यावी.
२भविष्याच्या दूष्टीने शहरातील रस्त्यांचे हिस्ट्री कार्ड तयार करण्यात यावे या आंदोलनात चेतन बेंद्रे, यशवंत कांबळे, गोविंद माळी,प्रणव शिंदे, सुंदर ओव्हाळ, चंद्रमणी जावळे, मीना जावळे,आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.