www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
कळंब – येथील पुरोगामी विचारश्रेणीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा पत्रकार सुभाष घोडके यांची स्वराज इंडिया या बिगर राजकीय संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी दि.२० ऑक्टोबर २०२२ रोजी पुणे येथून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या स्वराज इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष ललित बाबर यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात समाजातील शोषित वर्गाच्या विविध प्रश्नांना संघटित करत हे कार्य व संघटना लोकसहभागातून उभी करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाला अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सुभाष घोडके यांनी रेल्वे बोर्डाच्या सल्लागारपदी,दलित सेना जिल्हाध्यक्षपदी,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि पत्रकार म्हणून बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी १९८८ पासून प्रामाणिकपणे व एकनिष्ठ राहून सामाजिक कार्य केले आहे. त्यांना सामाजिक कामाचा दांडगा अनुभव असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे.
सुभाष घोडके यांची स्वराज इंडियाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.