परंडा तालुक्यात दुर्दैवी घटना नदी पात्रात वाहून १६वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

Picture of starmazanews

starmazanews

परंडा : २० आक्टोंबर तालुक्यातील ढगपिंपरी येथे ओम बालाजी गरड (१६) हा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा दुर्दैवी मुत्यू झाला. ही घटना गुरूवारी दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ओम गरड याचा मृतदेह तब्बल १८ तासानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी दि. २१ रोजी सकाळी अकराच्या सुमारास आवारपिंपरी शिवारात उल्फा नदीच्या पात्रातुन काढण्यात आला.
पुराच्या पाण्यात ओम गरड वाहून गेला असल्याची माहिती मिळतात, त्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. परंडा पोलिस ठाणे व तहसीलदार यांना या घटनेची माहिती देण्यात आली. महसूल व पोलीस प्रशासनाने उस्मानाबाद येथील एनडीआरएफ पथकाला माहिती दिली. मात्र हे पथक ओमच्या शोध कार्यासाठी घटनेचा दुसर्‍या दिवशी दाखल झाले.
पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना विशाल खोसे, पोकॉ अमोल वाघमारे, तलाठी गुळमीरे, ढगपिंपरीचे पोलिस पाटील हरिदास हावळे यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थांनी ओमचे शोध कार्य सुरू केले. मात्र ओमचा मुतदेह सापडत नव्हता. दुसर्‍या दिवशी सकाळी देवगाव परिसरातील नदी पात्रातून ओमचे प्रेत वाहून जात असल्याची माहिती आवारपिंपरी येथील आदित्य नरूटे व सुधीर चौधरी या तरूणांना कळताच दोघांनी आवारपिंपरी शिवारातील उल्फा नदीकडे धाव घेतली.
लक्ष देत नदीकाठी थांबले असताना काही वेळातच त्यांना ओमचे प्रेत नदीपात्राच्या पुरात वाहुन येत असताना दिसले. यावेळी आदित्य नरूटे याने तात्काळ मोठ्या धाडसाने काठोकाठ वाहत्या नदीपात्रात उडी मारून सुधीर चौधरी याच्या मदतीने ओमचे प्रेत बाहेर काढले.
यावेळी एनडीआरएफ चे पथक मात्र देवगाव येथे होते.

पथकाच्या मदती शिवाय आदित्य नरूटे याने नदीत उडी मारून प्रेत बाहेर काढले व प्रेत सापडल्याची माहिती आदित्य नरूटे व सुधीर चौधरी या दोघांनी नातेवाईकांसह प्रशासनाला दिली. पोना खोसे, पोकॉ वाघमारे, तलाठी गुळमीरे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. ऐन दिवाळी सणाच्या सुरवातीलाच गरड कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!