www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांची मागणी.
बार्शी तालुक्यात सतत पडत असलेल्या जास्त प्रमाणाच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळपिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या नुकसान झालेल्या फळपिकांचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे.
नुकसान झालेले फळपिकांचे पंचनामे झाल्यानंतर त्या नुकसानीची भरपाई शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.