www.starmazanews.comपिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवडच्या शहराच्या जीवनदायी आसलेल्या पवना, इंद्रायणी या दोन नद्या प्रदुषण मुक्त होवून स्वच्छ ,सुंदर हरीत प्रवाही होण्यासाठी सामाजिक संस्था नागरिक आणी प्रशासन यांच्या सहयोगाने शहरात जागृती आणी प्रत्येक्ष काम कसे करता येईल याबाबत प्रशासनाने सकारात्मक भुमिका घ्यावी
पवना आणि इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीनी आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर ,जलबीरादरी संस्थेचे नरेंद्र चुग,विनोद बोधनकर सुमीत पांडे ,अविरत श्रमदान संस्थेचे सचिन लांडगे ,डाँ निलेश लोंढे आणी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी तर्फे गणेश बोरा आदी उपस्थित होते तसेच नदी संवर्धन ,नदी स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम ,जलदिंडी नदीयात्रा जलपर्णी नदीत मिसळणारे सांडपाणी नदी किनारी मार्शलमार्फत कचरा टाकण्यात अटकाव करणे, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली महापालीका आयुक्त शेखर सिंह यांनी नदी संवर्धनासाठी सकारात्मक भुमिका घेतली आसून संघटणाच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.