परंडयात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

Picture of starmazanews

starmazanews

शेतातील पिकांची नासाडी तर शहरातील नागरिकांच्या जिवीतास धोका

न.प. चे दुर्लक्ष

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा – शहारा लगत च्या शेतात शहरातील मोकाट जनावरे घुसून पिंकांची नासधूस वारंवार करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे . मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी परंडा तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्याकडे अनेक वेळा करूनही जनावरे मोकाटच आहेत .नगर परिषदेने काढलेला कोंडावडा औटघटकेचा ठरला असून त्यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांची दहशत तर जनावरांची वर्दळ कायम आहे .मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे . शेत पीकांची नासाडी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान मोकाट जनावरं करीत आहेत . तसेच बाजारपेठ, रोड, चौक, बसस्थानक आदि ठिकाणी यांचा वावर असल्याने नागरिकांना तसेच व्यापारी, भाजी, फळे विक्रते यांना त्रास सहन करावा लागत आहे . या जनावरांनी नागरिकांना धडक देणे, चेंगरने व तुडवल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत .नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे . शेतकऱ्यांना रात्रंदिवस राखण करावी लागत आहे . मोकाट जनावरे शेतकऱ्यांनी पकडून बांधून ठेवली तर हे लोक दमदाटी करून सोडवून नेतात . नगर परिषदेच्या दुर्लक्षीत कारभारामुळे यांची मुजोरी व मनगटशाही वाढली आहे .मोकाट जनावरे,डुकरं- कुञी यांचा सुळसुळाट झाला आहे.त्यामुळे दुर्गंधी ,अस्वच्छता पसरून घाणीचे साम्राज्य शहरात निर्माण झाले असून परिसरातील नागरीकांचे अरोग्य धोक्यात आले आहे.स्वछतेचे धडे शिकविणार्या शासन प्रशासनाने या परिसरात स्वछता राबवावी,आशी मागणी होत आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Recent Posts
error: Content is protected !!