जगाला शांती,अहिंसा व सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती ‘ईद-ए-मिलाद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा ,ता.९ शांती,अहिंसा व सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त,रविवार ता.९ रोजी शहरात ‘ईद-ए-मिलाद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जुलुस मिरवणुकीत मोठ्यासंख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील मशिदीमध्ये जुलुस कमिटीचे सर्व मौलाना यांच्या धार्मिक पठणानंतर सकाळी १० वाजता जुलुस मिरवणुकीस सुरुवात झाली.मिरवणुकीत हज याञेकरु,तरुणवर्ग, उर्दु शाळेतील मुले-मुली,दुचाकी, सजवलेली चार चाकी वाहने,फुलांची चादर,सह अल्लाहचे पठन करीत जुलुस मिरवणुकीत मोठ्यासंख्येने शहरातील मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.शहरात ठिकठिकाणी,गोल्डन चौक,मंडई चौकात सरबत,मिठाई,बिस्कीट पुडे,फळांचे वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने सामोसे,बिस्कीटपुडे वाटपासाठी अजीम हन्नुरे,सिद्दिक हन्नुरे,कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी,समरजीतसिंह ठाकुर,हणमंत पाटील,संकेत ठाकुर,हिमालय वाघमारे,मुसा हन्नुरे,समीर पठाण,अॕड जहीर चौधरी,समाधान कोळेकर,तुषार कोळेकर,गौरव पाटील आदिसह युवकांनी पुढाकार घेतला.चेतक रोड येथे सरबत वाटपासाठी याराना ग्रुपचे असिफ शेख,गौस शेख,शरीफ मुजावर,सलमान सय्यद तौफीक शेख आदिंनी पुढाकार घेतला.तालुका संभाजी ब्रिगेडच्यावतीने समाधान खुळे,मनोज कोळगे आदिसह कार्यकर्तेंनी बिस्कीटपुडे,मिठाईचे वाटप केले.मंडई चौकात महेदिया समाजाच्यावतीने मिठाई,केळीचे वाटपासाठी मैनुद्दीन तुटके,पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे,खय्युम तुटके,आलम तुटके,अयूब तुटके,बबलु तुटके,इनुस तुटके आदिंनी पुढाकार घेतला.मंडई चौकात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी जुलुस कमिटीला शुभेच्छा दिल्या. शहराचा आठवडी बाजार रविवारी भरतो.मुख्यमार्गावरुन मिरवणुकीसाठी बाजारकरुंनी रस्ता रिकामा केला होता.दुपारी बारानंतर आठवडा बाजारात पुर्ववत दुकाने थाटली,भाजीविक्रेते बसले.जुलुस मिरवणुक महात्मा फुले चौक,आंबेडकर चौक,निझामपुरा,मंगळवारपेठ,गोल्डन चौक,मंडई पेठमार्गे ख्वाॕजा बद्रोद्दीन यांच्या दर्गाहवर गेली.याठिकाणी फातेहखानी होऊन समारोप करण्यात आला.

पैगंबरजंयतीनिमित्त ख्वाजा बद्रोद्दीन दर्गाहवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.शहरात ठिकठिकाणी आकर्षक कमानी उभारल्या होत्या.झेंडे,पताका लावण्यात आल्या होत्या. मिरवणुकीसाठी हाफिज अब्दुल मलिक, मौलाना अलीम समीर साहब,हाफिज निजाम रजा, शहर ए-काझी मौलाना जफरअली काझी,मौलाना गुलाम रजा गौस हाफीज,समीर बागवान,हाफिज मुस्तफा सय्यद,हाफिज जुबेर,हाफिज हारुण,हाफिज सर्फराज आदिसह जुलुस कमिटीने पुढाकार घेतला होता. पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे ,सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत हिंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी,गृहरक्षक दलाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जुलुस कमिटीच्यावतीने दर्गाहवर सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!