स्टार माझा न्यूज:- अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर येवले
श्रीगोंद्यातील त्या महिलेचा अनैतिक संबंधाच्या संशयातून खून.. पती, सासऱ्यानेच केला गेम.. महिलेच्या मृतदेहाचा परीसरात दुर्गंध सुटल्याने प्रकार झाला उघड..!
दोन दिवसांपूर्वी म्हणजे दिनांक 6 ऑक्टोबर 2022 गुरूवार रोजी सायंकाळी श्रीगोंद्यातील रहिवाशी असलेल्या त्या महीलेचा मृतदेह चाकण आळंदी रस्त्यालगत निर्जनस्थळी पुरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. परंतु, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या महिलेचा खून स्वतः तीच्या पतीने व सासऱ्याने केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली असून, दोन जण फरार आहेत.
आशा देशमुख (सध्या रा. मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गोरक्ष देशमुख (वय 35, रा.मेदनकरवाडी) सासरा बबन देशमुख (वय 62 रा. अहमदनगर) व रोशन भगत (वय 22, रा. मेदनकरवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, रोशनचा मित्र रेवा आणि मुंडे असे दोघेजण अद्याप फरार आहेत.
आरोपी गोरक्ष याने दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी इतर आरोपींच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात तो नेऊन पुरला. पुढे त्याने स्वतः वर संशय येवू नये यासाठी चाकण पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
त्यानंतर गोरक्षनेच शनिवारी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रेत खड्यातून बाहेर काढले व जाळले. मात्र, पाऊस पडत असल्याने प्रेत अर्धवट जळाले. नंतर त्यांनी ते प्रेत चाकण – आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या तळ्यात फेकून दिले.
मात्र, परिसरात दुर्गंधी पसरताच पोलिसांना याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यावेळी गळा आवळून खून झाल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट होताच पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबुल केला.
पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना अटक केली असून, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढिल तपास करत आहेत.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.