स्टार माझा न्यूज:- अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर येवले
दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी राशिन गावात श्री जगदंबा देवीची पालखी होती. नेहमीच पालखीचे दर्शनासाठी भाविक मोठया प्रमाणात गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चो-या करतात. त्या अनुषंगाने कर्जत पोलीस स्टेशन कडुन पालखीच्या मागे पुढे पालखी सोबत सतर्क पोलीस बंदोबस्त साध्या वेशात व वर्दीमध्ये ठेवण्यात आला होता. बंदोबस्त दरम्यान चो-याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांवर कर्जत पोलिसांनी लक्ष ठेऊन त्यांना ताब्यात घेतले. वेगवेळया ठिकानाहून सहा चोरटे १) राहुल बापू जाधव, वय २१ रा दुधनी ता अक्कलकोट जि सोलापुर २) कृष्णा अर्जुन जाधव, वय २३ रा सादे ता करमाळा जि सोलापुर ३) प्रकाश हिरामन डुकळे, १९ रा चौफुला ता हवेली जि पुणे ४) शिवाजी भगवान माने, २७ रा देऊळगाव ता परांडा जि उस्मानाबाद ५) अजित महेंद्र शिंदे, १९ रा पारेवाडी ता परांडा जि उस्मानाबाद ६) पिल्या काळे, २० रा नेरले ता परांडा जि उस्मानाबाद ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला त्यांचेवर चोरीचा प्रयत्न तसेच चोरीच्या उद्देशाने संशईत रित्या पालखीत फिरणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरचे चोरटे पकडल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणा-या चो-यांवर पोलीसांना नियंत्रण करता आले.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतिष गावीत, पोसई भगवान शिरसाठ, पोसई अमरजित मोरे, पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मारुती काळे, अंकुश ढवळे, संभाजी वाबळे, अमोल लोखंडे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे, मनोज लातुरकर, बळीराम काकडे, महादेव कोहक, सचिन वारे , ईश्वर माने यांनी केली.
स्टार माझा न्यूज संपादक:-रियाज पठाण — 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.