कर्जत च्या आडत दुकानदाराची दहा लाखांची बॅग पळवणारा कर्जत पोलिसांकडून गावठी पिस्तूल व काडतूसासह जेरबंद.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.comअहमदनगर जिल्हा प्रतिनिधी :-ज्ञानेश्वर येवले


कर्जतच्या एका आडत दुकानदाराने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून दहा लाखांची रोकड काढली होती. ही रक्कम दुचाकीवरून बॅगमध्ये मार्केटकडे घेऊन येत असताना दोन हमाल कामगारांनी ही बॅग हिसकावून पळवुन नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर घटनेतील एका आरोपीस यापूर्वीच अटक केले होते. परंतु सदर प्रकारातील दुसरा आरोपी सोमनाथ विठ्ठल साळुंखे वय-२७ वर्षे हा तेव्हापासून फरार होता त्यास गजाआड करण्यात आता कर्जत पोलिसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,’पियुष रविंद्र कोठारी (रा.कर्जत) यांचे शेतकरी मार्केट कर्जत येथे आडत दुकान आहे.शेतकऱ्यांकडुन खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी कर्जत येथील अर्बन बॅंकेतून त्यांनी दहा लाखांची रोकड आपल्या ताब्यात घेऊन ती बॅगमध्ये ठेऊन मोटार सायकलवर मार्केटकडे येत होते. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ विठ्ठल साळुंखे वय-२७ वर्षे व प्रमोद विजय आतार वय-१९ वर्षे, दोघेही रा.कोरेगाव ता.कर्जत यांनी फिर्यादी पियुष कोठारी यांच्या मोटार सायकलवर असलेली बॅग हिसकाऊन पळवून नेली असल्याची फिर्याद कोठारी यांनी दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिली होती.
कर्जत पोलीस फरार आरोपीच्या मागावर होते. फरार आरोपी हा कर्जत तालुक्यात रात्री उशिरा दाखल झाला असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून कर्जत पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सदर आरोपीस ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून गावठी बनावटीचे २५,००० रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. सदर आरोपीवर पिस्तूल आणि काडतूस बाळगल्याबद्दल वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. आरोपीस माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कर्जत यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे अनंत सालगुडे पोलीस जवान शाहूराज तिकटे उद्धव दिंडे सलीम शेख प्रवीण अंधारे यांनी केली आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!