www.starmazanews.comपरंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दि.५ नवराञोत्सवानिमित्त शहरातील ग्रामदैवत असलेल्या गार भवानी मंदीरात बुधवार ता.५ सांयकाळी ७ वाजता, परंपरेनुसार विधिवत शस्ञपुजा व शमीपुजन करुन सिमोल्लघंन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.आपट्याची पाने लुटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शहरातील जुन्या तहसील कार्यालयातील ट्रेझरी कार्यालयात सांय सहा वाजता, लक्ष्मीपुजन करुन ढोल ताशाच्या गजरात,आराधी पोत घेऊन वाजत गाजत मिरवणुक काढुन,गार भवानी मंदिरात,तहसिलदार रेणुकादास देवणीकर,पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या हस्ते शस्ञपुजन व शमीपुजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मकरंद जोशी यांनी पौराहित्य केले.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी,सपोनि विक्रांत हिंगे,तलाठी चंद्रकांत कसाब,माजी उपनगराध्यक्ष श्याम मोरे, नवनाथ सोणवणे,हणमंत जाधव,विजय बनसोडे,आदिसह शासकीय कर्मचारी,प्रतिष्ठीत नागरीक आदिंची उपस्थिती होती. सकाळपासुनच विजयादशमीनिमित्त,बाजारपेठेत फुलांसह,विविध वस्तु खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.गारभवानी परिसर आकर्षक रोषणाईने उजळुन निघाला होता.दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.गारभवानी नवराञ उत्सवासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे,दत्ता मेहेर’,बाळराजे माकणीकर, उमेश सोणवणे,राहुल लोकरे,शिवाजी सोनवणे,यल्लाप्पा काळे,अरुण कानडे,श्रावण पवार, अमित ठाकुर,आदिनीं पुढाकार घेतला.तसेच शहराचे ग्रामदैवत भवानी शंकर मंदिरातील,अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी एकमेकांना शमीचे पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छां दिल्या.या मंदिरात पौराहित्य मंदीराचे विश्वस्त किशोर बैरागी यांनी केले.
फोटो-परंडा-गारभवानी मंदिरात शस्ञपुजा व शमीपुजा करताना तहसिलदार रेणुकादास देवणीकर व पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे ,चंद्रकांत कसाब आदि.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.