धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त फुले-आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी-पालक संघटनेचे अधिवेशन.

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२२ निमित्ताने, समता सैनिक दल आयोजीत…फुले-आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी-पालक संघटनेचे अधिवेशन आणि दिक्षाभूमी नागपूर येथे बौद्धांचे संवैधानिक हक्क व सवलतींबाबत जनजागृती अभियान

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०: शैक्षणिक प्रतिक्रांतीचा दस्तैवज, फुले-शाहू आंबेडकरांना अभिप्रेत शैक्षणिक क्रांती, बौद्धांचे संवैधानिक हक्क व सवलतीं यांचे संरक्षण ., या विषयांना अनुसरून दि. ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्ताने फुले-आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी-पालक संघटनेचे अधिवेशन , बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, कामठी रोड, नागपूर. येथे आयोजीत करण्यात आले आहे.


दिनांक ४ ऑक्टोबर रोजी संघटनेचे अधिवेशन असेल. अधिवेशनास मान. प्रदिप गायकवाड, डॉ. अवनीकुमार पाटील, मान. प्रदिप घोडेस्वार सर, प्रा. संजय अभ्यंकर, कुलदीप रामटेके, ॲड. गुणरत्न रामटेके, प्रसेनजीत खंडारे, विनित डोंगरदिवे ऊमेशभाऊ इंगळे इत्यादी मान्यवर संबोधन करतील. आणि दि. ५ ऑक्टोबर रोजी दिक्षाभूमी येथे ऊपरोक्त विषयांना अनुसरून ॲड. गणेश भोईर, अस्मिता अभ्यंकर, भगवान जाधव , चंचला मुररकर, शोभा अंबादे, हंसकला पाटील आणि समता सैनिक दलाचे सैनिक जनजागृती अभियान राबवतील. जनतेने जनजागृती अभियानात सहभागी
होऊन लाभ घ्यावा .असे आव्हान समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक मान. प्रदिप गायकवाड यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे सूचीत केले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!