मृगाली विजय वानखडे हिची उत्तुंग भरारी……….
मृगाली विजय वानखडे हिची उत्तुंग भरारी……….अंजनगाव सुर्जी नगरीत मानाचा तुरा…
……
कतार इंटरनॅशनल एअरलाइन मध्ये निवड
www.starmazanews.comप्रतिनिधी अंजनगाव सुर्जी/मनोज मेळे:
अंजनगाव सुर्जी येथील मृगाली वानखडे असून तिचे शिक्षण प्रगती हायस्कूलमध्ये अंजनगाव सुर्जी येथे झाले आहे.
ती शाळेत शिक्षणात आधीपासून होतकरू व हुशार असल्यामुळे तसेच तिच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यामुळे तिने यश संपादन केले.
तिचे वडील विजय वानखडे स. शिक्षक आणि आई सौ मंदाताई वानखडे ह्या प्रागतिक विद्यालय अंजनगाव सुरजी येथे शिक्षिका म्हणून आहेत. कु मृगालीची आधी निवड एअर इंडिया मध्ये झाली होती.
परंतु तिने त्या भरोशावर न राहता जिद्दीने अभ्यास करून आपल्याला काहीतरी अजून पुढे भरारी घ्यावयाची आहे म्हणून तिने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून तिने इंटरनॅशनल एअरलाइन मध्ये तिची निवड झाली असून अंजनगाव सुरजी नाहीतर अमरावती जिल्ह्यासाठी एक भुषणावह असणारी एक बाजू आहे.
त्याबद्दल मृगालीला प्रगती शाळेच्या वतीने तिचे व तिच्या आई-वडिलांचे भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मृगली ही आपल्या आई-वडिलांचे श्रेय व शिक्षकांचे यांच्या आशीर्वादाने मी ही भरारी संपादन केली अशी तिची प्रतिक्रिया आहे.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.