www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
सोलापूर/बार्शी(प्रतिनिधी)दि.१९ सप्टें.२०२२, अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर,बीड या राष्ट्रीय मार्गावरील जामगाव(आ) येथील चौकामध्ये सरकार विरोधी घोषणा देत शेतकऱ्यांनी सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
एक तास रास्ता रोको आंदोलन
यावेळी बोलताना शंकर गायकवाड म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून वगळल्यामुळे पिकविम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहतील म्हणून सरकारने शेतकऱ्यावर अन्याय न करता अतिवृष्टीची नुकसान भरपाई व पीक विम्याची अग्रीम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा मंत्रालयामध्ये घुसून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा खणखणीत इशाराही गायकवाड यांनी यावेळी स्टार माझा न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.
शेतकरी आंदोलकांना मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड

त्यावेळी बाळासाहेब जगताप, विष्णू आवटे, शिवाजी खोडवे, बालाजी कागदे, रोहित शिंदे,भाऊसाहेब आवटे, दत्तात्रय जाधव, मारुती आवटे, परमेश्वर आवटे, पंकज आवटे, वैजिनाथ आवटे, बबन गडदे, विनोद आवटे, प्रशांत आवटे, शंकर लटके, हरीष लोखंडे, चंद्रसेन यादव, बापू गरदडे, विठ्ठल गरदडे, गणेश यादव, सचिन लोखंडे, अभिजीत लोखंडे, माणिक गरदडे, हनुमंत यादव, सुरेश यादव, तानाजी यादव, प्रमोद आवटे, बालाजी यादव, सौरभ यादव, बलभीम लावंड, शेखर लावंड, विलास आवटे, अजय आवटे, बाळासाहेब शिंदे, अशोक काटकर, अरुण वाकुरे, राहुल शिंदे, सागर उकिरडे, किशोर काशीद, स्वप्निल काटकर, गुजर शिंदे, विलास लुंगसे, चंद्रकांत गडदे, विठ्ठल चित्राव, नंदकुमार आवटे, सोमनाथ मुकटे, शिवाजी नवले, राजेश आवटे, विजय आवटे, तुळशीराम आवटे, योगेश जाधव, संभाजी गडदे, पंडित गडदे, भाऊ काळे, वैजिनाथ आवटे आदिलसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन तहसीलचे प्रतिनिधी व पांगरीचे मंडळ अधिकारी विशाल नलवडे यांनी स्वीकारले तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवला होता.
आंदोलकांना मार्गदर्शन करताना व विविध मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.