निजामी राजवटी विरुद्ध लढा पेटविनारे सुवर्णरत्न

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी ज्या नर रत्नाने आपले शीर तळ हातावर घेऊन जगले त्यांची स्मृती भारत मातेच्या सुपुत्रांना पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील यात काही शंका असन्याचे कारण नाही. सध्या आपला देश आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहे. देश स्वतंत्र्य होण्यासाठी अनेक देशवासीयांनी यांनी लढा दिला. आपला सोनार समाज ही या कामी मागे नव्हता. देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील हैदराबाद मुक्ती लढ्यातील निजामी राजवटीविरुद्ध पेटून उठणारे स्वर्ण रत्न स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय श्री दत्तात्रय दामोदर पोतदार यांच्या कार्याची माहिती करून देत आहोत. हैदराबाद स्वतंत्रचा लढा हा हिंदुस्थानच्या स्वतंत्र्यसंग्रामाचा शेवटचा टप्पा नाही, हैदराबाद स्वतंत्रसंग्रामा नंतर गोव्याची लढाई झाली त्यामुळे हैदराबाद संग्राम हा शेवटचा लढा म्हणता येणार नाही हैदराबादची लढाई ही राजकीय दृष्ट्या अतिशय गुंतागुंतीची व महत्त्वाची होती त्यात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटी यश मिळाले. श्री दत्तात्रय दामोदर पोतदार यांचा जन्म सन 1920 च्या ऑगस्टमध्ये मौजे देगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री दामोदर राजेंद्र पोतदार व आईचे नाव प्रयागबाई होते श्री दामोदर पोतदार यांचा व्यवसाय मुख्यत्वे करून सोनार काम व शेती हे होते .श्री दत्तात्रेय यांचे शिक्षण मराठी ४थी पर्यंत झाले होते. त्यांच्या वयाच्या 25, 26 व्या वर्षी त्यांचे लग्न वडिलांनी केले. लग्नानंतर त्यांचे मन संसारात रमेना याच दरम्यान हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा आंदोलन नेते स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, व्यंकटराव देशमुख ,सोलापूर येथील नेते वी.रा .पाटील छन्नूसिंग चंदिले अदी नेत्यांनी आव्हानाला प्रतिसाद देऊन श्री दत्तात्रय पोतदार व त्यांचे सहकारी जनार्दन पाटील ,मनोहर नवले, मल्लिकार्जुन साळुंखे, बाबुराव लागुडे आदींनी गावात एक तरुण मंडळ स्थापन केले. उस्मानाबाद आता सध्या ते धाराशिव बीड सोलापूर परभणी नांदेड आदि जिल्ह्यात सरहद्दीवर लढाऊ कॅम्प उघडण्यास सुरुवात केली होती. उस्मानाबाद जिल्ह्याच्या व बार्शीच्या सरहद्दी वर त्याकाळी मुस्ती गौडगाव आगळगाव चिंचोली हे कॅम्प होते. आंदोलनातील नेत्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत श्री दत्तात्रय पोतदार व त्यांच्या सहकारी त्या कॅम्पवर दखल झाले. उस्मानाबाद व बिदर जिल्ह्याचे नियंत्रण केंद्र सोलापूर येथे होते. या केंद्रातून श्री फुलचंद गांधी यांच्या आदेशानुसार सर्व सूत्रे हालत होती. गोडगाव कॅम्प तडवळ कॅम्प मस्ती कॅम्प बार्शी कॅम्प आधी ठिकाणी सोलापुरात तयार झालेले बॉम्ब व हत्यारे पुरवण्याचे काम श्री दत्तात्रय पोतदार व त्यांच्या साथीदार करू लागले पोकळी या कॅम्प चे प्रमुख सोलापूरचे बंडोबा जाधव होते. श्री दत्तात्रय पोतदार व त्यांचे साथीदार व पोकळी कॅम्प च्या स्वातंत्र्यसैनिकांनी नान्नजचा लढा दिला नान्नज च्या रजाकार केंद्रातील अतिशय दुराचारी अत्याचारी गुंडानी धुमाकूळ माजवीला होता. पोकळी कॅम्पवरील सैनिकांनी शस्त्र हल्ला चढवला मोठी चकमक झाली पोलीस व रजाकार पळून गेले. स्वातंत्र्य सैनिकांनी नान्नजचा टोल नाका आपल्या ताब्यात घेतला. नान्नज चा लढा हा एक महत्वपूर्ण असा मानला जातो या लड्यामुळे तुळजापूर व परंडा तालुक्यातील 62 खेड्यांचे मुक्तापूर स्वराज्य स्थापन झाले.

श्री खंडोबा जाधव यांच्या आदेशानुसार तुळजापूर येथे दत्तात्रय पोतदार यांच्यासह 27 लोकांनी सत्याग्रह केला सत्याग्रही वर निजामी पोलिसांकडून लाटीचार्ज करण्यात आला .अशा परिस्थितीत देखील श्री दत्तात्रय पोतदार यांनी तिरंगा तहसील कार्यालयावर फडकवला त्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण झाली काही भूमिगत झाले, श्री दत्तात्रय पोतदार यांना कोर्टात उभे करण्यात आले त्यांना दोन वर्षे शिक्षा झाली व त्यांनी क्षमेची याचना केली नाही मी तुरुंगातच माझे घर मानतो असे ठणकावून सांगितले. त्यांना गुलबर्गा येथील सेंट्रल जेलमध्ये नेऊन ठेवण्यात आले. श्री दत्तात्रय पोतदार यांना दोन वर्षे शिक्षा होऊन गुलबर्गा येथील सेंट्रल जेलमध्ये ठेवल्याची बातमी त्यांचे वडील श्री दामोदर पोतदार व आई प्रयाग बाई यांना समजली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. एकुलता एक मुलगा जेलमध्ये गेला म्हणून काही दिवस त्यांनी अन्नत्याग केला, गावातील जेष्ठ मंडळी व नातेवाईकांनी त्यांना धीर देऊन त्यांची समजूत काढली तरी ते चिंतेत राहायचे ते महानुभाव पंथाचे होते, भगवान श्रीकृष्णावर त्यांची अपार श्रद्धा होती त्यांचा मुलगा दत्तात्रेय याची तुरुंगातून लवकर सुटका होऊ दे त्यालाही महानुभाव पंथाची दीक्षा देऊ असे नवस केले. योगा योगअसा सरदार वल्लभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थांचा प्रश्न पोलीस कारवाईने चुटकीसरशी सोडवला 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय फौज हैदराबाद संस्थानात घुसली 17 तारखेला निजामाने शरणागती पत्करली हैदराबादच्या चारमिनार वरून झेंडा खाली उतरवला आणि भारताचा तिरंगा ध्वज फडकावला. शिक्षा भोगून ११ महिने झाले होते हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्याने श्री दत्तात्रेय पोतदार यांची पुढील शिक्षा रद्द झाली, जेलमधून सुटका झाल्यानंतर ते मौजे देगाव या जन्मगावी आल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला. अख्खा देगाव गावातून त्यांचे बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात येऊन ग्रामस्थांनी यथोचित सत्कार केला. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रपंच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांना चार 4 मुले व एक 1 मुलगी अशी अपत्ये झाले त्यांच्या चार 4 मुलापैकी बार्शी येथे स्थायिक झालेल्या नायब तहसीलदार असलेले श्री उत्तम पोतदार या मुलाकडे राहू लागले. श्री दत्तात्रय पोतदार यांचे वडील श्री दामोदर पोतदार यांच्या नवसानुसार श्री दत्तात्रेय यांनी वयाच्या 60 व्या वर्षी महानुभाव पंथ स्वीकारून ते संन्यासी झाले. उर्वरित आयुष्य देवा धर्मात घालून स्वतःला मिळणारे सन्मान पेन्शन व मुलाच्या मदतीने उपळाई रोड बार्शी येथे श्रीकृष्ण मंदिराचे बांधकाम केले. स्वतंत्र लढ्यातील त्यांचे योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा सन्मानपत्र आणि सन्मान देऊन 1 मे 1970 रोजी ते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. शासनाकडून मिळणाऱ्या इतर सुविधा नम्रपणे नाकारल्या, स्वातंत्र्य मिळणेपूर्वी देगाव वाळूज ता. तुळजापूर जि. नळदुर्ग मध्ये होते. स्वातंत्र्यानंतर निजामी राजवटीने म्हणजे त्यांचे सैनिक रजा कराचा त्रास वाढत होता तरुण पिढीने आपले गाव पण स्वराज्यात सामील व्हावे म्हणून निजाम राजवटीविरुद्ध बंड करून उठली.सुवर्णरत्न स्वतंत्र सैनिक श्री दत्तात्रय पोतदार यांची प्राणज्योत 91 व्या वर्षी वर्धापकाळाने दिनांक 12 मे 2001 रोजी मावळली.अश्या या ध्येयवादी आणि देशभक्त स्वातंत्र्य सैनिकास त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सोनार समाज कधी विसरू शकणार नाही.

सविस्तर माहिती, श्री दत्तात्रय पोतदार यांचे बार्शी येथील पुत्र श्री उत्तम पोतदार 9422648097

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!