बार्शी पोलीसांची कामगिरी 6 तासात 3 महिला चोरांना अटक!

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

परराज्यातील महिला टोळी जेरबंद, 2.05 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बार्शी – शहरात 07/09/2022 रोजी फिर्यादी नामे प्रियंका अंकुश थाटे वय २७ वर्षे रा. ईडा अंतगांव ता. भुम, , जि. उस्मानाबाद या बार्शी येथून मिरज येथे जाणे करीता औरंगाबाद इचलकरंजी बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांचेजवळ असलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण 2,05,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने ती बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५९७/२०२२ भादवि. कलम ३७९ प्रमाणे दाखल आहेत. यातील 3 महिला आरोपींना पोलिसांनी अवघ्या 6 तासांत जेरबंद केले आहे.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना यातील फिर्यादीचे सोने व पैसे हे तीन महिलानी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्या नंतर त्यांचा तांत्रिक पध्दतीने तपास केला असता सदरच्या महिला ह्या बार्शी सोलापूर बसने सोलापूर कडे गेल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना नान्नज ता. उत्तर सोलापूर येथून ताब्यात घेवून त्यांची महिला पोलीस अंमलदार करवी अंग झडती घेतली असता महिला पद्मीनी अनंत सकट वय-५० वर्षे, रहाणार धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि. गुलबर्गा (कर्नाटक) हिचे अंगझडतीमध्ये १,८०,०००/- रू चे चार तोळयाचे सोन्याचे पट्टीचे गंठण व २२,५००/-रु. चे पाच ग्रॉम वजनाचे कानातील सोन्याचे दागिणे तसेच महिला नुरी रंजित उपाडे वय – ४० वर्षे रा. सदर, हिची अंग झडतीमध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम २,५००/-रु. असे एकुण 2,05,000/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पद्मीनी अनंत सकट, नुरी रंजित उपाडे, नर्मदाबाई नेरू उपादे उर्फ माधुरी जॅकी पाटील वय-३५ वर्षे, रा.धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा राज्य कर्नाटक यांना सदर गुन्हयात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहाय्यक पोलिस फौजदार अजित वरपे, पोलीस अरूण माळी, सिंधु देशमुख, वैभव ठेंगल, मनिष पवार, संगाप्पा मुळे, रवी लगदिवे, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, अविनाश पवार यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या कामगिरीचे बार्शी शहरामध्ये कौतुक केले जात आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!