www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जनता विद्यालय येडशीचे क्रीडाशिक्षक श्री दयानंद श्रीरंग रेवडकर यांना ए आय एस एफ वैद्यकीय समिती यांच्या वतीने आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार २०२२ ने ५ सप्टेंबर रोजी खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रेवडकर यांनी क्रीडा,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे तसेच क्रीडा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास उत्तम होत असल्याकारणाने समाजाला त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा, प्रोत्साहन, आत्मविश्वास मिळावा व स्वतःची आणि समाजाची कार्यक्षमता वाढवी यासाठी आपल्याला त्यांना राज्यस्तरीय क्रीडा शिक्षक महाराष्ट्र राज्य २०२२ हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
वैद्यकीय समितीचे राज्याध्यक्ष डॉ. अमोल जाधव, प्राचार्य ज्ञानप्रकाश भार्गव, डॉ.जगदिश हेडाव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी रेवडकर सरांची पत्नी सौ.ज्योती रेवडकर , मुलगा अविराज रेवडकर व महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे सहशिक्षक अतुल नलगे उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे ,सचिव पी. टी. पाटील,सहसचिव ए.पी.देबडवार खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य,सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक श्री.आर.डी. गाढवे,श्री.पी.ए. पांगरे, श्री.सी.एम नलवडे, श्री.बी.बी. करंजकर, श्री वाय. एम.दोरकर,तसेच सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.