www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
जालना, 7 सप्टेंबर(प्रतिनिधी)
जालना शहरातील झोपडपट्टी परीसर शेरसवार नगर येथील गरीब कुटुंबातील मुलीने नीट परीक्षेत झेप घेत कुटुंबाचे डॉक्टर बणण्याचे स्वप्न साकार केले आहे. बुधवारी उशीरा रात्री नीट परीक्षा 2022 चा ऑनलाईन निकाल झळकला यामध्ये 720 मधून कु.शीफा फिरदौस मोहम्मद युसुफ हिने 657 मार्कस घेत यश संपादन केले आहे. तीच्या कुटुंबाची हलाखिची परिस्थिती आहे तरीही तीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन करुन एमबीबीएस डॉक्टर बनण्याचे स्वप्न खरे करुन दाखवले. जालना जिल्ह्याचे नाव नीट परीक्षेत चमकले आहे. वडील मोहम्मद युसुफ हे दुस-याचे गैरेजवर टु व्हिलर मेकानिक असून आपल्या कुटुबाची उपजिविका भागवतात. मुलगा नसून चारही मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. आई लेडीज टेलरचे काम करुन परीवाराचा गाडा हाकण्यासाठी हातभार लावते. न्यु हायस्कुलच्या उर्दु माध्यमातून शिक्षण घेत या मुलीने उंच भरारी घेतली आहे. शिक्षक, नातेवाईकांनी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी केली होती. पुढील भविष्यासाठी सर्व समाजातून या मुलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.