दि 6 सप्टेंबर 2022 रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांना तिसऱ्या आघाडीच्या सदस्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.सिरसाव या गावाला तांबेवाडी ता भूम येथील धरणावरून पाणीपुवठा होतो.गावाची लोकसंख्या 10ते 12 हजाराच्या पुढे आहे .

सिरसाव ते तांबेवाडी धरण अंतर जवळ जवळ 11 किलोमिटर च्या पुढे अंतर आहे.तांबेवाडी धरणापासून सिरसाव येथे पाणी पोहचण्यासाठी कमीत कमी 2 तासाचा वेळ लागतो.त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास परत तेवढाच वेळ लागतो.त्यामुळे गावाची परिस्थिती अशी झाली आहे की धरण उशाला कोरड घश्याला.मुबलक पाणी असताना सुध्दा गावाला 15 ते 20 दिवसाआड पाणी मिळते.या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पाणीपुरवठयासाठी 24 तास वीपुरवठा होणे गरजेचे आहे त्यासाठी माणकेश्वर येथील 33 kv सबस्टेशन वरून स्वतंत्र वीजपुरवठा करावा अशी मागणी सिरसाव येथील तिसऱ्या आघाडीचे ग्रापंचायत सदस्य रियाज पठाण व भांडगाव चे सरपंच यांनी मंत्री महोदयांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.


त्यावर भूम च्या वीजपुरठा अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यावर नक्कीच विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.हा विषय मार्गी लागल्यास गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा दूर होईल या कामी तिसऱ्या आघाडीचे सदस्य रामेश्वर चोबे व मुकुंद चोबे यांचे सहकार्य लाभले तसेच या साठी विजय नवले,दादा ढगे व भांडगावचे सरपंच आणि आमचे सहकारी मित्र बापूसाहेब अंधारे यांचे सहकार्य लाभले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.