www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा-शहरातील जय भवानी गणेश मंडळ आयोजीत नृत्यकला स्पर्धेतील विजेते बक्षीसासह,यावेळी प्रसिध्द चिञपट संगीतकार डाॕ.जयभिम शिंदे,अर्जना भोञेकर,शुभम भातलवंडे,मंडळाचे अध्यक्ष आकाश काशीद आदि!
परंडा,ता.७(बातमीदार )शहरातील एकमेव ट्रस्टी असलेल्या जय भवानी गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजीत विविध वयोगटातील डान्सस्पर्धेत मंगळवार ता.६ रोजी बालकलाकारांनी,शालेय मुलामुलींनी बहारदार नृत्य अविष्कार सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

गणेशोत्सवानिमित्त जय भवानी गणेश मंडळाने विविध स्पर्धासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये लहान मोठ्या वयोगटात लिंबु चमचा,संगीत खुर्ची,पोत्यातुन उडी मारणे आदि निखळ स्पर्धा घेतल्या.मंगळवारी राञी शहरातील बालकलाकार,मुलामुलींच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी डान्सस्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना युवा नेते समीर पठाण यांच्या हस्ते करण्यात आला.डान्सस्पर्धेत हिंदी मराठी गीतासह लावणीनृत्यकला,मल्हारी गीतावर कलाकारांनी धमाल उडवित स्पर्धेत मोठी रंगत आणली.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन प्रसिध्द चिञपट संगीतकार डाॕ.जयभीम शिंदे,भरतनाट्यम नृत्य शिक्षिका अर्चना भोञेकर,नृत्यदिग्ददर्शक शुभम भातलवंडे यांनी काम पाहिले.यावेळी संगीतकार डाॕ.जयभीम शिंदे म्हणाले की,कुठलेली नृत्य कलेचे प्रशिक्षण न घेता शालेय मुलामुलींनी मंचावर येवुन कलाअविष्कार सादरीकरण करणे आनंददायीच आहे.पालकांनी आपल्या पाल्यांना लहान वयातच विविध कलागुण अंगी येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.मुलांना आनंदी जगु द्यावे.भविष्यात हीच मुले विविध क्षेञात नक्कीच यशस्वी होतील.मोठे कलाकार होवुन नावारुपाला येतील.डान्सस्पर्धेतील विजेत्यांना पदक,बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.डान्स स्पर्धेतील अनुक्रमे विजेते पुढीलप्रमाणे-लहान गट प्रथम रोहीत वाघमारे,द्वितीय स्वरा आगरकर,तृतीय शर्वरी काशीद,मध्यम गट-सिध्दी चव्हाण,खुशी आगरकर,आयुश मिश्रा मोठा गट-मुग्धा काशीद,अंजली कशब,तृतीय ग्रुपडान्स सिद्दीकी चौधरी,फातीमा शेख,सिध्दीक शेख,ताजेरा पठाण आदि लिंबु चमचा स्पर्धा-आनु माने,शर्वरी काशीद,नैतीक मिश्रा,ऋतुराज पवार संगीत खुर्ची-नैतीक मिश्रा,सुहानी शुक्ला,खुशी आगरकर पोत्यातील उडी मारणे-ओम जाधव,प्रथमेश आगरकर आदिंनी पारितोषीक पटकावले. या स्पर्धेसाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष आकाश काशीद,आदित्य नांगरे,सनी काशीद,आण्णा लोकरे,कुणाल जाधव,वैभव मस्के,विनायक काटवटे,ओंकार काशीद,करण काशीद,सुहास आगरकर,बाळराजे आगरकर,अतुल काशीद,शंतनु खर्डेकर,बाॕबी काशीद,योगेश मस्के,राहुल आगरकर, मंडळाचे मार्गदर्शक प्रकाश काशीद, पंकज नांगरे,विशाल काशीद यांनी पुढाकार घेतला.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.