आमदार राजभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते ७३ कि.मी लांबीच्या रस्त्याचे भूमिपूजन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

टेंभुर्णी ते कुसळंब ७३ कि.मी .पूर्वीच्या दोन पदरी रस्त्याचे रूपांतर करून नव्याने तीन पदरी रस्त्या होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र त्यांनी दिली. ८४ कोटी रुपये खर्चून सदरचे ७३ किलोमीटरचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादच्या संत सतरामदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या कामाचे टेंडर घेतलेले असून, दोन वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.



मागील दोन ते चार वर्षापासून सदरचे काम रखडले होते, हे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. यावेळी मा. गडकरी साहेबांनी लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.



बार्शी तालुक्याला जोडण्यात येणाऱ्या इतर तालुके व जिल्ह्याचे दळणवळणाच्या रस्त्याचे जाळे, त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील गावांना एकमेकांशी जोडणारे रस्ते करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी आमदार राजेंद्र राऊत हे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सतत संपर्कात राहून प्रयत्नशील आहेत. मागील अडीच वर्षांच्या त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी बार्शी शहर व तालुक्यातील रस्त्यांकरता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत व अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, प्रशांत कथले, विलास आप्पा रेणके, सुभाष शेठ लोढा, विजय नाना राऊत, प्रोजेक्ट मॅनेजर एस.पी. शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!