बिलकीस बानो अत्याचार प्रकरणातील ११ आरोपीची सुटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदरांना निवेदन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा – दि. २७) गुजरात सरकारने बिलकीस बानो यांच्या वर केलेलेल्या अत्याचार प्रकरणातील ११ बलात्कारी आरोपीची सुटका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या विभागीय अध्यक्ष वैशाली मोटे यांच्या मागदर्शना खाली परंडा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.२७ ऑगष्ट रोजी तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन त्या आरोपीना पुन्हा गजाआड करा अशी मागणी करण्यात आली.


राष्ट्रपती यांना पाठवीन्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. सन २००२ मध्ये गुजरात मध्ये जो नरसंहार झाला त्यापैकी बिलकीस बानो या एका पीडित महिलेवर अन्याय झाला. तिच्यावर अकरा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलींचा खुन करून कुटुंब संपवले.परंतु हिंमत न हारता प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला.मुंबईमध्ये विशेष सी.बी.आय.न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय,आणि सर्वोच्च न्यायालयाने,त्या ११ आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.न्याय मिळाला असे वाटले होते परंतु देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रधानमंत्री यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात महिलांच्या सन्मानाच्या घोषणा दिल्या मात्र त्या सायंकाळ पर्यंत हवेतच विरघळून गेल्या आणि गुजरात सरकारने बिलकस प्रकरणातील ११ बलात्कारी आरोपीची नियमबाह्य सुटका केली.
हे कृत्य केवळ असंविधानिकच नाही तर मानवतेला काळीमा फासणारी असून न्यायिक व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी आहे.याची राष्ट्रपती यांनी दखल घेऊन पीडित महिलेस न्याय मिळवून देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या निवेदनावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षा स्वाती गायकवाड, उपाध्यक्षा दैवशाला खैरे, मा.नगरसेविका रत्नमाला बनसोडे,रंजना माने,रूपाली लोखंडे,राखीताई देशमुख, मिनाक्षी काळे,राष्ट्रवादी सामाजीक विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बासोडे, शहराध्यक्ष वाजीद दखनी, युवक अध्यक्ष जावेद मुजावर, संचालक मजुर फेडरेशन धनंजय हांडे, मा.सरपंच हनुमंत गायकवाड, बाबुराव काळेसर घनःश्याम शिंदे, ,अमोल जगताप, शिरू शेख,समीर मदारी, अविनाश आटोळे सर,श्रीहरी नाईकवाडी,नंदु शिंदे,,रंगनाथ ओव्हाळ,दिपक ओव्हाळ,बिभीषण खुणे,,हुसेन शेख,सलीम हन्नुरे,अजहर शेख,जुबेर पठाण,शरीफ शेख, समीर काझी,पप्पू शेख,अफ्रेर शेख, शफीक इनामदार, शाबुदिन सय्यद, जुबेर दखनी, मेहबुब काझी,अस्तम मदारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!