यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्य समन्वयक तथा पीसीपीएनडीटीच्या राज्य सदस्या मा वैशालीताई राहुल मोटे यांची डोणगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंतीला उपस्थिती .

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी हनुमंत गायकवाड

*यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्य समन्वयक तथा पीसीपीएनडीटीच्या राज्य सदस्या मा वैशालीताई राहुल मोटे यांची डोणगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंतीला उपस्थिती .*
आज दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी *मोजे डोणगाव तालुका परंडा* जिल्हा उस्मानाबाद येथे *साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या* जयंतीनिमित्त पीसीपीएनडीटच्या राज्य सदस्या *मा वैशालीताई राहुल मोटे*
यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले .
*परंडा नगरीचे माजी नगराध्यक्ष झाकीरभाई सौदागर, जिल्हा परिषद उस्मानाबाद माजी कृषी सभापती नवनाथ अप्पा जगताप, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, डीजे ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष धनाजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, आरपीआय आठवले गट प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, नगरसेवक संजय घाडगे, सुशील काटवटे, प्राध्यापक शरद झोंबाडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गायकवाड, महिला बचत गटाच्या समन्वय मीनाक्षी काळे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, श्रीमती देशाला ताई खैरे, जय लहुजी ग्रुप चे सर्व कार्यकर्ते, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, शिवाजी चव्हाण, प्राध्यापक अविनाश आटोळे , डॉक्टर बापू मिस्किन , डॉक्टर काळे,शेंडगे* प्रदेश कार्यकारणी सदस्य जय लहजी ग्रुप उस्मानाबादचे गायकवाड , वाशी कळंब भूम तालुकाध्यक्ष व परंडा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जयंती निमित्त. जयंती उत्सव समितीने तालुक्यातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्यामुळे मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध फकीरा कादंबरी देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा आगळावेगळा कार्यक्रम जयंती उत्सव समितीने आयोजित केला होता.
*प्रा. शरद झोंबाडे सर,* सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष *हनुमंत गायकवाड ,* आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस *संजय कुमार बनसोडे जी* व मा *वैशालीताई मोटे यांनी यांनी उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले.*
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक *बापूसाहेब मिस्कीन* व जयंती *उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण* व सर्व कार्यकर्ते यांनी केले.
कार्यक्रमाचे *प्रभावी सूत्रसंचालन बाबुराव काळे सर यांनी केले.*

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!