www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
गाताचीवाडी व या परिसरातील इतर गांवच्या ग्रामस्थांनी आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे नवीन वीज उपकेंद्र उभारणीची मागणी केली होती. या भागातील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने, तेथील शेतकऱ्यांना योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी ग्रामस्थांच्या या मागणीनुसार आमदार राजाभाऊ राऊत यांनी हे वीज उपकेंद्र मंजूर करण्यासाठी संबंधित खात्याकडे सतत पत्र व्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येवून या उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे.

नव्याने उभारण्यात येणारे हे वीज उपकेंद्र अंदाजे ४ कोटी रुपयांचे असून, याचा फायदा नव्याने उभारण्यात येणा-या MIDC करीता तसेच गाताचीवाडी, ताडसौंदणे, बेलगांव, मांडेगांव, खडकलगांव, धस पिंपळगाव, शेलगांव व्हळे, देवगांव, कांदलगांव या गावातील शेतकरी बांधवांना होणार आहे.


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.