www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपल्या आवाजाने घर करून परंडा तालुक्याचे व धाराशिव जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजविणारे कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा, पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे या कार्यक्रमातील गायक श्री. सोहिल मुलानी यांचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी “संवाद” निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. श्री. सोहिल मुलानी हे मुळचे परंडा तालुक्यातील आलेश्वर येथील आहेत.
या सत्कारावेळी परंडा न.प. मा. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, बिभीषण हांगे, फारूख मुलानी, सारंग घोगरे, अजित पाटील तसेच गावातील त्यांचे सहकारी उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









